
#जीवीत हानी नाही!चालक जखमी!
#भाजप नेते गजानन पाटीलसह गावकर्यानी केली मदत!
संदेश क्रांती न्यू्ज :
खानापूर प्रतिनिधी
मणतुर्गा ( ता.खानापूर ) गावा जवळील रस्त्यावरी पुलाच्या वळणावर गोव्याहुन खानापुरकडे कोंबड्या घेऊन जाणारा बलोरा वाहन शुक्रवारी दि.२८ रोजी दुपारी रस्त्यावरच पलटी झाल्याने वाहतुक बराच काळ ठप्प झाली.
एम.एच ०९ इल २९३१ बलोरा वाहन गोव्याहुन खानापूराकडे भरधाव वेगाने जात असताना मणतर्गा गावाच्या रस्त्यावरील पुलाच्या वळणावर रस्त्यावर पलटी झाल्याने वाहतुकीची बराच काळ कोंडी झाली .
घटनेची माहिती मिळताच मणतुर्गा गावचे भाजपनेते गजानन पाटील व गावकर्यानी घटनास्थळी जाऊन जीसीबीच्या साह्याने बलोरा वाहन बाजुला करून वहातुकीला रस्ता मोकळा केला.
बलोरा वाहन चालक हा किरकोळ जखमी झाला. गावकर्याच्या सह्याने लागलीच मदत झाल्याने वाहतुक सुरळीत झाली.
सध्या हेमाडगा रस्त्यावरील मणतुर्गा रेल्वे फाटक दुरूस्ती बंद करण्यात आले आहे.त्यामुळे हेम्माडगा मार्गे गोव्याला जाणासाठी असोगा मणतुर्गा मार्गे वाहतुक सुरू आहे.
मणतुर्गा रेल्वे फाटक बंदच!
हेम्माड मार्गावरील मणतुर्गा रेल्वे फाटक दुरूस्तीच्या नावाखाली बंद ठेवण्यात आले. परंतु १५ मार्च पर्यत रेल्वे फाटक वााहतुकीला मोकळ करून देतो. असे संबधित कंत्राटधाराने हमी दिली होती. मार्च महिणा संपत आला तरी सुध्दा कामे पूर्ण केली नाहीत.या बाबत मणतुर्ग्याचे समाज सेवक शांताराम पाटील यानी मुदतीच्या आत रस्ता वाहतुकीस मोकळा केला नाही. त्यामुळे वाहतुकीला अडथळे निर्माण होतआहे. तेव्हा मणतुर्गा गावच्या नागरीकांच्यावतीन लवकरच रास्ता रोको करून सरकारला जाग आणणार असे सांगीतले.
तेव्हा कंत्राटदाराने रेल्वे पुलाचे काम लवकर करून रस्ता वाहतुकीला मोकळा करावा. व होणारे आपघात टाळावे.अशी गावकर्यानी मागणी केली आहे.