
#कबड्डी दि.३ जानेवारी, व खो-खो दि ५जानेवारी रोजी!
#नाव नोंदणी शेवटची तारीख २६ डिसेंबर!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर ( सुहास पाटील )
बेळगांव मराठा मंडळ शिक्षण संस्थेच्या मराठा मंडळ स्पोर्टस ( MANIA 2K25 ) वतीने बेळगांव जिल्हा मर्यादित आंतर शालेय आणि पदवीपूर्व महाविद्यालय भव्य कबड्डी व खो-खो स्पर्धाचे आयोजन दि.३ जानेवारी व दि. ५ जानेवारी रोजी खानापूर येथील मराठा मंडळ हायस्कूलच्य क्रिडांगणावर आयोजित करण्यात आले आहे.
कबड्डी स्पर्धा वेळ :
दि.३ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता मुलींच्यासाठी कबड्डी स्पर्धा.
तर सायंकाळी ६ वाजता मुलासाठी कबड्डीस्पर्धा.
बक्षिसे कबड्डी व खो खो स्पर्धासाठी.
१७ वर्षाखालील मुले व मुलीसाठी
पहिले बक्षिस १५ हजार रू.व ट्राॅफी,दुसरे बक्षिस ११ हजार रू.व ट्राफी, तिसरे बक्षिस ७हजार रू.व ट्राॅफी.
प्रवेश फी : ५०० रू.
कबड्डी व खो खो स्पर्धेसाठी ,वयोगट १७ वर्षाखालील मुले मुली कबड्डीसाठी वजन ५५ किलो गट.
खो -खो स्पर्धा वेळ:
दि.५ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता मुली साठी तर सायंकाळी ६ वाजता मुला करीता.
बक्षिसे कबड्डी व खो-खो करीता
वयोगट १९ वर्षाखालील मुले व मुलीकरीता
पहिले बक्षिस २१हजार रू .व ट्राफी दुसरे बक्षिस १५ हजार रू. व ट्राॅफी ,तिसरे बक्षिस ७हजार रू.व ट्राॅफी,
प्रवेश फी ७०० रू.
वयोगट १९ वर्षाखालील मुले व मुली कबड्डी ६० किलो वजनीगटासाठी.
नाव नोंदनीसाठी अंतिम तारीख २६ डिसेंबर आहे.
संपर्कासाठी मो.नंबर ९७४१४५१७५२,६३६१२३७९८८,७२०४५९३७५७.
मराठा मंडळ हायस्कूलच्या क्रिडांगणावर ग्राऊंडची तयारी!
खानापूर मराठा मंडळच्या हायस्कूलच्या क्रिडांगणावर कबड्डी व खो खो ग्राऊंडची तयारी सुरू आहे.
मराठा मंडळ शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा राजश्री नागराजू याच्या मार्गदर्शना खाली होणार्या कबड्डी व खो खो स्पर्धासाठी ग्रांऊडची तयारी करण्यात येत आहे.यावेळी मराठा मंडळ शिक्षण संस्थेच्या क्रीडाशिक्षकानी उपस्थित राहुन ग्रांऊडची तयार करत आहेत.