
खानापूर प्रतिनिधी
खानापूर को.आँप.बॅकेची निवडणुक रविवारी दि.१२ जानेवारी रोजी मोठ्या चुरशीने पार पडली. परंतु बॅकेच्या दोन्ही पॅनलनी न्यायालयात धाव घेऊन मतदारांची संख्या वाढवुन आणली. त्यामुळे उच्च न्यायालयातील सुनवाणीपर्यत मतमोजणी स्थगीत ठेवण्यात आली होती.
परंतु खानापूर को.आँप.बॅकेच्या मतमोजणीच्या स्थगीतीचा मार्ग मोकळा झाला आहे. उच्च न्यायालयाच्या धारवाड खंडपीठात गुरूवारी दि.३० रोजी झालेल्या सुनावणीत मतमोजणीला हिरवा कंदील मिळाला आहे. तेव्हा सहकार खात्याच्या निबंधका कडुन मतमोजणी आज शनिवारी दि.८ रोजी होणारआहे.
गेल्या महिण्याभरा पासुन दोन्ही ही पॅनलच्या उमेदवाराच्या मनात हुरहुर लागुन होती.तर मतदरांच्या मनात उत्सुकता लागुन होती.
त्यामुळे जिल्हा सहकार निबंधकाना मतमोजणीची तारीख जाहिर करण्याचे आदेश दिले आहे. नेमकी मतमोजणी ही सुट्टीच्या दिवशी केली जाणार असल्याने आज शनिारी दि.८ फेब्रुवारी रोजी सकाळी १०.३० मतमोजणी होत आहे.
सध्या मतपेट्या तहसीलदारांच्या अखत्यारीत ठेवण्यात आल्या आहेत.