
#दोन दिवसात तक्रारीचे होणार निवारण!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
मेंडिल (ता.खानापूर) हे गाव अतिदुर्गम भागातील शिरोली ग्राम पंचायतीच्या हद्दीतील असुन देशाला स्वांतत्र्य मिळुन ७८ वर्षे होत आली तरी मेंडिल गावाच्या नागरीकाना अद्याप अंधारात जीवन जगावे लागत आहे.
वीजपुरवठा करण्यास वनखात्याने नेहमीच अडथळा आणला .त्यामुळे गेल्या सात वर्षापूर्वी सौर ऊर्जा प्रकल्प हेस्काॅम खात्याने उभारला होता.परंतु त्याची कालमर्यादा संपताच सौर उर्जा प्रकल्पात बिघाड झाला. सौरऊर्जा बंद झाली .आणि मेंडिल गावाच्या नागरीकांना अंधारातच दिवस काढणे नशीबाला आले.
त्यामुळे रात्रीच्यावेळी विद्यार्थ्याना अभ्यास करणे खूपच त्रासाचे झाले आहे.तर ग्रामस्थाना रात्र अंधारातच काढावी लागते.म्हणून त्रासलेल्या नागरीकानी हेस्काॅम कार्यालयावर धडक मोर्चा काढून समस्या मांडल्या.
यावेळी हेस्काॅमचे कार्यकारी अभियंते जगदिश मोहिते हे कामानिमित्त बेळगावला गेल्यामुळे संपर्क साधुन समस्या मांडली .
यावेळी कार्यकारी अभियंते जगदिश मोहित यानी वरिष्ठ अधिकार्याशी चर्चा करून येत्या दोन दिवसात मेंडिल गावची सौरऊर्जा बद्दल निर्णय घेतला असुन समस्या सोडवतो असे आश्वासन देताच तक्रारीचे निवेदन देऊण धरणे मागे घेतले.
मंडिल गावच्या ग्रामस्थाचे आंदोलन समजताच भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी भेट देऊण समस्यांचे निवारण करून समस्या सोडवू असे सांगीतले .
यावेळी मेंडिल गावचे नागरीक उपस्थित होते.