
#.आमदार विठ्ठल हलगेकर,माजी आम.अरविंद पाटील ,भाजप जिल्हा अध्यक्ष सुभाष पाटील व भाजप नेत्याची पोलिस स्थानकात धाव!
#रात्री उशीरापर्यत पोलिस स्थानकात सोपस्कर!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
कर्नाटक राज्याच्या महिला व बाल कल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्याबद्दल गुरूवारी दि.१९ रोजी भाजपचे एम एल सी सी टी रवी यानी आपमानस्पद भाषा वापरल्या प्रकरणी मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यानी हिरेबागेवाडी पोलिस्थानकात तक्रार दाखल केली.
यावेळी हिरेबागेवाडी पोलिसानी एम एल सी सी टी रवी याच्या विरोध्दात आपमानास्पद भाषा वापरल्याबदल एफ आर आय नोंदविला.
मात्र रात्री आठ वाजता एमएलसी सी टी रवी याना खानापूर पोलिस स्थानकात दाखल करण्यात आले.
खानापूर पोलिस स्थानकात भाजपचे एम एल सी सी टी रवी दाखल होताच भाजपचे जिल्हा अध्यक्ष सुभाष पाटील ,आमदार विठ्ठलराव हलगेकर,माजी आमदार अरविंद पाटील ,उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी,भाजप नेते पंडीत ओगले ,संजय कुबल ,गजानन पाटील सह अँड चेतन मणेरीकर हजर झाले.
यावेळी नेत्याना पोलिस स्थानकात प्रवेश देण्यास नकार दिला . पोलिसाशी हुज्जत घातल्यानंतर काही नेत्याना प्रवेश देण्यात आला.
यावेळी अँड .चेतन मणेरीकर याना पोलिसानी नकार दिला. नंतर वकीलाना पोलिसानी प्रवेश दिला.यावेळी खानापूर पोलिस स्थानकात भाजप नेते ,कार्यकर्त्यानी एकच गर्दी केली होती.रात्री उशीरा पर्यत खानापूर पोलिस स्थानकात गोंधळ निर्माण झाला होता.