
#समर्थ इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये आयोजन!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर (सुहास पाटील )
खानापूर तालुका डाॅक्टर असोसिएशन व सरकारी दवाखाना यांच्या सयुक्त विद्यामाने रविवारी येथील समर्थ इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबीरात हजारो रूग्णानी लाभ घेतला.
शिबीराच्या अध्यक्षस्थानी खानापूर तालुका डाॅक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डाॅ.डी ई नाडगौडा होते. तर प्रमुख उपस्थिती म्हणून आमदार विठ्ठलराव हलगेकर, माजी आमदार व एआयसीसी सेक्रेटरी डाॅ.अंजली निंबाळकर,तालुका आरोग्य अधिकारी डाॅ.महेश किवडसन्नवर ,डाॅ अनिल ,डाॅ बी.एम तुक्कार आदी मान्यवर उपस्थित होते.
तर शिबीरासाठी डाॅ.संतोष हजारे,डाॅ.देवदत्त देसाई,डाॅ.रोहित जोशी,डाँ.प्रविन जैन,डाॅ.दिपक पुजार,डाॅ.दत्तप्रसाद गिजरे,डाॅ.हर्षद सुतार,डाॅ.अमय पट्टाडे,डाॅ नितेश आदी तज्ञ डाॅक्टर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरूवात समर्थ शाळेच्या मुलीच्या ईशस्तवन गीताने झाली.
प्रास्ताविक डाॅ.वैभव पाटील यानी केले.यावेळी उपस्थित मान्यवरांच्याहस्ते दिपप्रज्वलन व फोटो पुजन करण्यात आले.
उपस्थित मान्यवराचे पुष्प व मानचिन्ह देऊन स्वागत करण्यात आले.
यावेळी बोलताना माजी आमदार डाॅ.अंजली निंबाळकर म्हणाले की, प्रथमच खानापूर तालुक्यात इतक्या मोठ्या प्रमाणात मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन खानापूर तालुका डाॅक्टर असोसिएशन व सरकारी दवाखाना यांच्यावतीने करण्यात आले आहे.तेव्हा तालुक्यातील जनतेने याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा.असे आवाहन केले. व तज्ञ डाॅक्टरानी रूग्णानी चांगली सेवा देऊन आजार दूर करावा.असे सांगुन ,डाॅक्टर असोसिएशनचे चेअरमन डाॅ.डी ई नाडगौडा यानी इतके परिश्रम घेऊन शिबीराचे नियोजन केले याचे मला कौतुक वाटत आहे.असे सांगीतले.
आमदार हलगेकर म्हणाले की,खानापूर तालुक्यातील जनतेला मोफत आरोग्य तपासणीची ही एक सुवर्ण संधी आहे. तेव्हा तज्ञ डाॅक्टराकडुन आपल्या आजाराची माहिती व सल्ला घ्या.
खानापूर तालुक्यातील डाॅक्टरनी कोविड काळात जवळपास १०० हुन अधिकजनाचे प्राण वाचविले आहेत.याचा मला चांगला अनुभव आला आहे.असे सांगीतले.
यावेळी डाॅ अनिल यानी विचार व्यक्त केले.
अध्यक्षीय भाषणात बोलताना डाॅक्टर असोसिएशनचे चेअरमन डाॅ.नाडगौडा म्हणाले की समाजासाठी काही तरी करणे हे आपले कर्तव्य आहे.यासाठी इतक्या मोठ्याप्रमाणात मोफत आरोग्य शिबीराचे आयोजन केले आहे. तेव्हा जनतेला याचा नक्कीच लाभ होणार याचा मला विश्वास आहे. असे सांगुन तज्ञ डाॅक्टरानी आपला मोलाचा वेळ देऊण याठिकाणी आल्याबद्दल धन्यवाद दिले.
यावेळी शिबीराला खानापूर तालुका काॅग्रेस अध्यक्ष अँड ईश्वर घाडी,महादेव कोळी ,डाँ.एन एल कदम,डाॅ.एम.एन पाटील तसेच डाॅक्टर असोसिएशनचे सर्व डाॅक्टर ,सरकारी दवाखान्याचे डाॅक्टर ,नर्स व कर्मचारी मोठ्यासंख्येने उपस्थित होते.
आभार डाॅ सागर नार्वेकर यानी मानले.