
#तारीख पे तारीख पडून २७ जानेवारी रोजी निवडणूक नक्की! #खानापूर नगरपंचायतीच्या अध्यक्ष,उपाध्यक्ष पदाची निवडणुक होणार!
#दोन्ही ही प़दे सामान्य महिलासाठी!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर ( सुहास पाटील )
खानापूर नगरपंचायतीच्या अध्यक्ष,उपाध्यक्ष निवडणूक सोमवारी दि.२७ जानेवारी रोजी होणार आहे. दुपारी ३ वाजता निवडणूकीचा प्रक्रिया नगरपंचायतीच्या सभागृहात होणार आहे.
सोमवारी दि.२७ जानेवारी रोजी सकाळी ११ ते दुपारी १ वाजता पर्यत नगराध्यक्ष , उपनगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल करण्यात येणार आहेत .
अर्ज दाखल करण्यात आल्यानंतर अर्जाची छाननी होऊन दुपारी ३ वाजता निवडणुक प्रक्रियेला सुरूवात होणार आहे.निवडणुक अधिकारी म्हणुन तहसीलदार प्रकाश गायकवाड काम पाहणार आहेत.
या निवडणूकीच्या संदर्भात नगरपंचायतीच्या २० नगरसेवकाना नोटीस जारी करण्यात आली आहे.
ही निवडणूक केवळ दोन वर्षाच्या कालावधीसाठी नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष ही दोन्ही पदे सामान्य महिला पदासाठी राखीव ठेवण्यात आली आहेत.
खानापूर नगरपचायतीवर २० नगरसेवका पैकी ९ महिला नगरेसविका आहेत. यापैकी उत्सुक महिला नगरसेविकाची संख्य तीन ते चार पर्यत नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष पदासाठी राहाणार आहे.त्यामुळे ही निवडणुक चुरशीची होणार आहे
या निवडणुकीत २० नगरसेवका सह आमदार,खासदार ,एम.एल .सी याना निवडणुकीचा अधिकार आहे.
मागील वेळी नगरसेवक प्रकाश बैलुरकर यानी आपली पत्नी नगरसेविका मिनाक्षी बैलुरकर याच्यासाठी खूप प्रयत्न केले होते.
पुन्हा खानापूर नगराध्यक्ष पदासाठी सामान्य महिला वर्गाची वर्णी लागल्याने पुन्हा चुरस होणार .अशी दाट शक्यता आहे.