
#लक्ष्मी यात्राकाळात दुर्घटना!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
नंदगड (ता.खानापूर ) येथे गेल्या २४ वर्षानंतर ग्रामदैवत लक्ष्मी यात्रेला सुरूवात झाली आहे. सर्वत्र यात्रेची धांदल सुरू असताना. गुरूवारी दि.२० रोजी नंदगड गावातील जनता काॅलनीत रघुनाथ मादार यांच्या घरामध्ये स्वयंपाक घरात गॅस सिलेंडर स्फोट होऊन रघुनाथ मादार( वय.३६) ,नागराज कोलकार (वय.३१) मसन्नावा कांबळे (वय .५६), मनुषा कांबळे (वय. २५),प्रकृती कांबळे व आराध्या कांबळे आदी गंभीर जखमी झाले आहेत.
घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या जवानानी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली.
नंदगड गावात गेल्या आठवडापासुन ग्रामदेवता लक्ष्मी देवीची यात्रा सुरू असल्याने गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याने भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.