
#माजी आमदार डाॅ.अंजली निंबाळकर यांच्याहस्ते उदघाटन!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर ( सुहास पाटील )
बेळगांव पणजी महामार्गावरील खानापूर जांबोटी क्राॅसवरील नविन बसस्थानकात गणेश हाॅटेलचे उदघाटन माजी आमदार व एआयसीसी सेक्रेटरी डाॅ.अंजली निंबाळकर यांच्याहस्ते फित कापून करण्यात आले.
प्रारंभी खानापूर तालुका काॅग्रेस अध्यक्ष अँड.ईश्वर घाडी यानी पुष्पगुच्छ देऊण स्वागत केले.
यावेळी नुतन बसस्थानकात नव्याने सुरू करण्यात आलेल्या गणेश हाॅटेलचे उदघाटन माजी आमदार व एआयसीसी सेक्रेटरी डाॅ.अंजली निंबाळकर यांनी फित कापून उदघाटन केले.
तर गणेश हाॅटेलची व्यवस्था पाहुन समाधान व्यक्त केले.यावेळी स्वत: पदार्थाची चव घेतली.
कार्यक्रमाला खानापूर तालुका काॅग्रेस अध्यक्ष अँड ईश्वर घाडी, काॅग्रेस नेते सुरेश जाधव,शहर अध्यक्ष महांतेश राऊत, महादेव कोळी, सुरेश दंडगल , यशवंत बिरजे, खानापूर तालुका ग्राम पंचायत सदस्य संघटना अध्यक्ष विनायक मुतगेकर, नगरेसेवक तोहीद चांकदनावर, ग्राम पंचायत सदस्य प्रसाद पाटील, संतोश हंजी, सरकार नियुक्त नगरसेवक इसार पठाण,सावित्री मादार, अनिता दंडगल,आदी शेकडो काॅग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.