
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
चन्नेवाडी ( ता.खानापूर) येथील रहिवासी व निवृत्त मुख्याध्यापक राजाराम लक्ष्मण पाटील ( आर.एल.पाटील) यांचे रविवारी दि.१९ जानेवारी रोजी वृध्दपकालीन निधन झाले.
त्याच्या पश्चात तीन मुलगे,सुना,नातवंडे असा परिवार आहे.
ते हलशी येथील मराठी शाळेचे मुख्याध्यापक म्हणून निवृत्त झाले होते.
त्याना खानापूर तालुका आर्दश शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होेते.
खानापूर तालुका महाराष्ट्र एकिकरण युवा समितीचे अध्यक्ष धनंयजय पाटील यांचे ते वडिल होत.