खानापूर ( सुहास पाटील)
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर शहरातील लोकमान्य सोसायटी संचालित रावसाहेब वागळे पदवीपूर्व महाविद्यालयात बारावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ नुकताच पार पडला.कार्यक्रमाची सुरवात विद्यार्थिनींच्या स्वागत गीताने झाली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकमान्य सोसायटीचे संचालक पंढरी परब ,जी एस एस कॉलेजचे निवृत्त प्राचार्य बंडू मजूकर, लोकमान्य शिक्षण विभागाचे समन्वयक डॉ.डी एन मिसाळे, कॉलेजचे सेक्रेटरी सत्यव्रत नाईक, प्राचार्या शरयू कदम यांच्या हस्ते फोटोपूजन व दिपप्रज्वलन झाले.
प्रास्ताविक प्रा. शंकर गावडा यांनी केले. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रमुख वक्ते माजी प्राचार्य मजूकर म्हणाले की. विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रम घेऊन अभ्यास करावा जीवनात यशस्वी होण्यासाठी अथक प्रयत्न करणे गरजेचे आहे.
यावेळी अध्यक्ष पंढरी परब म्हणाले की, अपयशाच्या कठीण खडकाखाली यशाच्या पाण्याचा गोड झरा असतो.. अपयशाची चिंता न बाळगता जिद्दीने परीक्षेला सामोरे जाण्याचे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.. डॉ डी एन मिसाळे, सत्यव्रत नाईक,प्राचार्या शरयू कदम, कु प्रणाली घाडी, कु.समृद्धी गुरव कु.समिक्षा वाणी यांनीही आपली मनोगते व्यक्त केली..कॉलेज मधील शिक्षक वृंदानी विद्यार्थ्यांना परीक्षे साठी शुभेच्छा व्यक्त केल्या.
मान्यवरांच्या हस्ते महाविद्यालयात घेण्यात आलेल्या सांस्कृतिक आणि क्रीडा स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले..यावेळी सन.२०२४ च्या बारावीच्या वार्षिक परीक्षेत महाविद्यालयात पहिला आलेल्या. कु. दत्ता देसाई, द्वितीय कु. सुरज धबाले, तृतीय कु.राजश्री सुतार, कलाविभागात प्रथम आलेल्या कु.रोहिणी देसाई द्वितीय कु. अक्षता गावडे तृतीय कु. ऐश्वर्या मेंडिलकर कु. कार्तिक पाटील यांना पारितोषिक देण्यात आले.स्व.रावसाहे वागळे यांच्या कन्या किशोरी जानोरकर यांनी कॉलेज मधील पाच गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांना दरवर्षी जाहीर केलेली शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली. यावर्षीचा रावसाहेब वागळे पदवीपूर्व महाविद्यालयाचा आदर्श विद्यार्थी कु. ज्ञानेश्वर मादार तर आदर्श विद्यार्थिनी कु. समिक्षा वाणी यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. तसेच राज्यस्तरीय खोखो आणि लांब उडी स्पर्धेत चमकदार कामगिरी केलेल्या कु. रेणुका तोरगल, कु. स्वाती घाडी यांचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन कु. रसिका गावडा हिने तर आभार कु. सानिका तिनेकर हिने मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी. प्रा. संदीप पाटील, .डी व्ही पाटील, गुंडू कोडला,.पी पी पाटील,प्रा.आर एस पाटील, इमिलिया फर्नांडिस, सोनी गुंजीकर व विद्यार्थीवर्गाने विशेष परिश्रम घेतले..