
#प्रमुख पाहुणे सुभाष तोपिनकट्टी यांची उपस्थिती!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
तोपिनकट्टी ( ता.खानापूर ) येथील श्री महालक्ष्मी ग्रुप संचालित श्रीमहालक्ष्मी ग्रुप एज्यूकेशन सोसायटीच्या शांतिनिकेतन पब्लिक स्कूलच्या इयत्ता १० वीच्या विद्यार्थ्याचा निरोप समारंभ कार्यक्रम नुकताच पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री महालक्ष्मी ग्रुपचे संस्थापक व आमदार विठ्ठलराव हलगेकर उपस्थित होते.
तर प्रमुख पाहुणे म्हणून सुभाष तोपिनकट्टी ,संचालक बी एम पाखरे, व इतर संचालक उपस्थित होते.
यावेळी बोलताना प्रमुख पाहुणे सुभाष तोपिनकट्टी यानी विद्यार्थ्याना ध्येय कसे असले पाहिजे त्याचबरोबर ध्येय गाठण्यासाठी विद्यार्थ्यानी सर्वोतपरी प्रयत्न तसेच स्पष्टपणे बोलले पाहिजेत. असे सांगुन विद्यार्थ्याना शुभेच्छा दिल्या.
यावेळी प्राचार्या स्वातीकमल वाळवे यानी मुलांना परीक्षेबद्दल मार्गदर्शन केेले. कार्यक्रमाचे औचित्य साधुन इयत्ता ९ वीच्या विद्यार्थ्यानी मनोरंजन कार्यक्रम सादर केले.
कार्यक्रमाला विद्यार्थी ,शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.