
#क्लार्क कम टाटा आँपरेटर म्हणून सेवेत होता!
#आत्महत्येचे कारण समजले नाही!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
निट्टूर ( ता खानापूर ) ग्राम पंचायतीचे कर्मचारी संजय कोळी (वय ४५) हे क्लार्क कम टाटा आपरेटर सेवा बाजवत होते.
बुधवारी दि.२ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता शेतवाडीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली.
याबाबत मिळालेली माहिती अशी की संजय कोळी हे मुळचे नागुर्डा गावचे रहिवाशी असुन ते निट्टर ग्राम पंचायतीत सन २००७ पासुन ते निट्टूर ग्राम पंचायतीत क्लार्क कम टाटा आँपरेटर म्हणून सेवा बजावत होते.
निट्टूर ग्रामपंचायतीत त्याच्या टाटा आँपरेटर म्हणून जबाबदारी होती. त्यामुळे नेहमी कामाच्या मानसिक तणावाखाली असायचे.
बुधवारी सकाळी नागुर्डा गावी सकाळी ९च्या सुमारास शेतीकडे जातो असे सांगुन घरातुन गेले होते. सकाळी उशीरापर्यत घरी परतले नाही. म्हणून शेतीकडे जाऊन शोधाशोध केली असता झाडाला गळफास लावुन आत्महत्या केल्याचे दिसुन आले.
लागलीच घटनेची माहिती खानापूर पोलिसाना देण्यात आली. पोलिसानी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. पोलिस पुढील तपास करत आहेत.
त्याच्या पश्चात पत्नी ,मुलगा,मुलगी,आई,असा परिवार आहे.
आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजु शकले नाही.