
#भारतीयजवान कृष्णा गावडे याचा सत्कार.
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर (सुहास पाटील)
ओतोळी गावचा निलावडे ग्राम पंचायत क्षेत्रात समावेश असल्याने गावच्या विकासासाठी प्रामुख्याने ओतोळी गावाच्या विकासाला प्राधान्य देणात आले आहे. विकासाच्या बाबतीत रस्ते ,गटारी व पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. ओतोळी शाळेचे मुख्याध्यापक के.एच .कौंदलकर यानी जिल्हा सरकारी नोकर वर्गाच्या क्रिडास्पर्धेत भरघोस यश संपादन केले आहे.तसेच शाळेच्या विद्यार्थ्यानीही क्रिडाक्षेत्रात प्रगती साधावी.अपेक्षा व्यक्त केली. ओतोळीचा पहिला भारतीय जवान कृष्णा गावडे याचा सत्कार केला.याचा आदर्श गावच्या युवकानी घेऊन सैन्यात भरती होण्याचे स्वप्न पाहावे.असे आवाहन ग्राम पंचायत सदस्य व भलवाद कमिटी सदस्य विनायक मुतगेकर यानी ओतोळी (ता. खानापूर ) येथे सालाबाद प्रमाणे यंदाही शनिवारी व रविवारी दोन दिवस पारायण सोहळा उत्साहात संपन्न झाला.यानिमित्त रविवारी दि.२३ रोजी विद्यार्थ्याचे सांस्कृतीक कार्यक्रम व गावचा पहिला भारतीय जवान कृष्णा मनोहर गावडे याचा सत्कार असा संयुक्त कार्यक्रम पार पडला.यावेळी केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्राम पंचायत सदस्य परशराम गावडे, लक्ष्मण शिंगाळे ,एस डी एम सी अध्यक्ष संजय रामणीचे ,निलावडे ग्राम पंचायतीचे सदस्य व भूलवाद कमिटीचे सदस्य विनायक मुतगेकर,मारूती हटकर,शिवाजी हुडेद,राजू गावडे,बाळू गावडे, शिक्षक पी टी साबळे उपस्थित होते.तर प्रमुख वक्ते म्हणून ए.जे .सावंत उपस्थित होते.
प्रास्ताविक व उपस्थितांचे स्वागत ओतोळी शाळेचे मुख्याध्यापक के.एच.कौंदलकर यानी केले. पारायण सोहळ्याचे औचित्य साधुन गावचा पहिला भारतीय जवान कृष्णा मनोहर गावडे यांचा गावच्यावतीने शाल,पुष्पहार घालुन सत्कार करण्यात आला.
यावेळी इयत्ता पहिली ते पाचवी पर्यतच्या विद्यार्थ्याचे सांस्कृतीक कार्यक्रम पार पडले. याविजेत्याना बक्षिसे देऊन गौरविण्यात आले .
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार मुख्याध्याक के.एच.कौदलकर या़नी मानले.