
#बरगावचे विरूपक्षी पाटील याना .२२ मते तर निडगलचे तानाजी कदम १२ मते!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुका पी एल डी बॅकेची पंचवार्षिक निवडणुकीत शनिवारी झालेल्या केवळ दोन जागेसाठी निवडणूक पार पडली.
पीएलडी बॅकेवर कर्जदार गटातील केवळ दोन जागेसाठी चार उमेदवार रिंगणात होते. गर्लगुंजी विभागातुन बरगावचे विरूपक्षी महादेव पाटील तर निडगल गावचे तानाजी दत्तू कदम यांच्यात चुरस होती.
कक्केरी विभागातुन प्रकाश सोमणिंग अग्रोळी व निळकंठ कृष्णाजी गुंजीकर याच्यात चुरस होती.
या चुरशीच्या निवडणुकीत गर्लगुंजी विभागातील ३४ मतदानापैकी विरूपक्षी पाटील बरगांव याना २२ मते पडली.तानाजी पाटील निडगल याना १२ मते पडली.
बरगावच्या विरूपाक्षी पाटील याना सभासदाचा पाठिंबा!
बरगावचे संचालक विरूपाक्षी पाटील हे मागील पाच वर्षात पीएलडी बॅकेचे व्हाईस चेअरमन म्हणून सेवा केली आहे. गर्लगुंजी विभागातील सदस्यांची त्यानी अनेक कामे केली.शेतकर्याना वेळोवेळी आडचणीच्यावेळी मदत केल्याने गर्लगुंजी विभागातील ३४ सभासदापैकी २२ सभासदानी बरगांवचे विरूपाक्षी पाटील याना मतदान करून विजय प्राप्त करून दिला. तर निडगलच्या तानाजी कदम याना १२ मते पडली.
त्यामुळे विरूपाक्षी पाटील हे विजयी झाले . व पुन्हा खानापूर पी एल डी बॅकेवर संचालक म्हणून निवडूण आले.
विजयी होताच बरगाव ग्रामस्थानी विरूपाक्षी पाटील याचे अभिनंदन करत गुलालाची उधळन करत व फटाक्याची आताषबाजी करत बरगाव गावात विजयोत्सव साजरा केला.
यावेळी मंगेश पाटील, सभांजी पाटील, कलमेश मादार , एम टी पाटील यांचे सहकार्य लाभले.तर श्रीराम सेना राष्ट्रीय अध्यक्ष रमाकांत दादा कोंडुसकर यानी प्रथमच श्रीराम सेनेचा उमेदवार निवडुण आल्या बद्दल अभिनंदन केले.