
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुका म ए समितीच्यावतीने मंगळवारी दि.१४ रोजी जांबोटी ( ता. खानापूर) येथील बाजारपेठेसह ,शिवस्मारक ,बसस्टॅड परिसरात खानापूर म ए समितीच्या अध्यक्षाच्या नेतृत्वा खाली हुतात्मा दिनाची जागृती पत्रके वाटप करून जागृती केली.
यावेळी जांबोटी जिल्हा पंचायत माजी सदस्य जयराम देसाई, माजी सभापती मारूती परमेकर,चंद्रकांत देसाई ,पावण्णापा देसाई,राजू देसाई,बबन गुरव ,तानाजी कांबळे ,प्रविण जांबोटकर, विजय सुतार ,इंद्रजित सडेकर,महेश कांबळे,तसेच सरचिटणीस आबासाहेब दळवी,गोपाळ पाटील,पाडुरंग सावंत, राजाराम देसाई,संजीव पाटील ,वसंत नावलकर आदी समिती कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.