
#आमदार विठ्ठलराव हलगेकर याच्याहस्ते कामाचा शुभारंभ!
#१६ लाख रू.निधीतुन कामाचा विकास !
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर ( सुहास पाटील )
खानापूर शहराचा विकास साधण्यासाठी अनेक विकास मंजुर झाली आहेत.
गुरूवारी दि ७ रोजी पणजी बेळगाव महामार्गावरील खानापूर शहरातील आंबेडकर गार्डन मध्ये ग्रॅनाईट फर्शी व सुशोभिकरणासाठी १६ लाखाचा निधीचा शुभारंभ करण्यात आला.
आमदार विठ्ठलराव हलगेकर यांच्याहस्ते पुजन करून कामाचा शुभारंभ!
थोर पुरूष डाॅ.बाबासाहेब आंबेडकर गार्डन मध्ये नविन ग्रॅनाईड फर्शी तसेच सुशोभिकरण कामाचा शुभारंभ आमदार विठ्ठलराव हलगेकर यांच्याहस्ते पुजन करून करण्यात आले.
प्रारंभी आमदार विठ्ठलराव हलगेकर यानी डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालुन अभिवादन करण्यात आले.
यावेळी नगरपंचायतीचे अभियंते श्री तिरूपती यानी प्रास्ताविक करून आमदार विठ्ठलराव हलगेकर यांचा शाल,पुष्पहार व श्रीफळ देऊन सत्कार केला व उपस्थिताचे स्वागत केले.
यावेळी बोलताना विठ्ठलराव हलगेकर म्हणाले की खानापूर शहराच्या विविध कामाच्या विकासासाठी ४० कोटी रूपयाचा निधी मंजुर झाला आहे.
त्यातील डाॅ.बाबासाहेब आंबेडकर गार्डनच्या सुशोभिकरणासाठी,जांबोटी क्राॅसवरील स्मारकात फेव्हर्स बसविण्यासाठी त्याचबरोबर वर्दे काॅलनितील गार्डनमध्ये लाईट सोय करण्यासाठी आदी कामाना १६ लाख रूपयाचा निधी मंजुर लवकरच कामे पूर्ण करणार असल्याचे सांगीतले.
खानापूर शहरात पाण्याची सोय व्हावी . यासाठी जे जे एम स्कीममधील २.० योजनेंतर्गत २० कोटीचा निधी मंजुर झाला आहे.त्याचा शुभारंभ होणार आहे.
३ कोटी रूपये निधीतुन शहरातील मागासवर्गीय रस्त्याची कामे!
असा एकुन ४० कोटी रूपयाचा निधी खानापूर शहराच्या विकास कामासाठी मिळाल्याची माहिती सांगीतली.
कार्यक्रमाला भाजपचे तालुका अध्यक्ष संजय कुबल,गुंडू तोपि नकट्टी,नगरपंचायतीचे नगरसेवक आपय्या कोडोळी,महमद वारेमनी,नगरसेविका मेघा कुंदरगी,फातिमा बेपारी, कर्मचारी प्रेमानंद नाईक,श्री शिवदत्त,श्री.कांबळे, काॅट्रक्टर विष्णू बेळगावकर,इतर मान्यवर उपस्थित होते