
#आर एफ ओ श्रीकांत पाटील यांची माहिती.!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुक्यात वर्षभर हत्तीनी हौदोस मांडला. पावसाळ्यात भात पिकांचे नुकसान केले.तर उन्हाळ्यात उस पिकांबरोबर केळा,सुपारी आदी पिकांचे नुकसान केले आहे.
अजुनही हत्तीनी खानापूर तालुक्यातील ठाण मांडुन शेतकर्याच्या पिकाचे नुकसन सुरूच आहे
शुक्रवारी दि .१४ रोजी सकाळी निट्टूर परिसरात शाळकरी मुलाना हत्तीचे दर्शन झाले. त्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. हत्तीने पणज बेळगाव महामार्गावरील सर्व्हिस रस्त्याच्या भुयारी पुलातुन निट्टूरच्या दिशेन प्रवेश केला.
याची माहिती वनखात्याला मिळताच आर एफ ओ श्रीकांत पाटील यांनी आपल्या सहकार्यासह निट्टूर , काटगाळी परीसर हत्तीचा शोध घेतला. त्याना हत्तीच्या पाऊल खुणा मिळाल्या. हा हत्ती राकसकोप परिसरात दाखल झाल्याची माहिती मिळाली.
त्यामुळे खानापूर तालुक्याच्या निट्टूर ,इदलहोंड, काटगाळी आदी भागातील नागरीकाच्या मनातील भिती दुर झाली .
तरी सुध्दा हत्तीपासुन सुरक्षित अंतर ठेवावे .हत्तीच्या वावरामुळे स्थानिक नागरूकांनी व वीट कामगरानी खबरदारी बाळगावी असे आवाहन केले आहे.