
#ग्रा.पं.सदस्या अंजना देसाई यानी मांडल्या समस्या!
#२४ खेड्यांचा समावेश!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुक्यातील ५१ ग्राम पंचायतीपैकी मोहिशेत ग्राम पंचायत ही सर्वात मोठी पंचायत म्हणून ओळखली जाते.या ग्राम पंचायतीच्या हद्दीत तब्बल २४ खेड्यांचा समावेश आहे. यातील वरकड ,पाटे ,सातनाळी,माचाळी, मुंडवाड,पिंपळे,मांजरपै,राजवळ,गवेगाळी आक्राळी,लोहारवाडा,कुरडवाड,अशा अनेक गावाच्या रस्त्याची दुर्दशा झाली आहे.
याकडे लोकप्रतिनिधीचे व सबंधीत खात्याच्या अधिकार्याचे लक्षच नाही.
यागावच्या नागरीकाना खडतर प्रवास करावा लागत आहे. याला कोणी वाली नाही का?
अशी खंत ग्राम पंचायत सदस्या अंजना देसाई यांनी पत्रकाराशी बोलताना मांडली.
त्यापुढे म्हणाल्या की खानापूर तालुक्यातील अति जंगलाने व्यापलेला मोहिशेत ग्राम पंचायतीचा परिसर आहे. जंगलातील हिंस्त्र प्राण्याचे भय तर भरपूर आहे.अस्वले ,गवी रेेडे, इतर जंगली प्राणी रस्तावरून येजा करत असतात. जंगली प्राण्याचे हल्ले दिवसाकाठी होतात.खराब रस्त्यामुळे जंगली प्राण्यापासुन बचाव करण्यासाठी योग्य रस्ता नाही.अशाने अनेकाना प्राण गमवावे लागतात.
रस्त्या अभावी गावाचा विकास ठप्प झाला आहे.
गेली कित्येक वर्षे ही गावे रस्त्याच्या प्रतिक्षेत आहेत.अद्याप रस्त्याची समस्या सुटलेली नाही.
नेते मंडळी निवडणुका तोंडावर आल्या की आश्वासने देऊण जातात.निवडणून आले की, दिलेली आश्वासने विसरून जातात. परत गावाना पाय लावत नाही.त्यामुळे या गांवाचा विकास होत नाही.
असे मत त्यानी व्यक्त केले.
तेव्हा लोकप्रतिनिधी व सबंधित खात्याच्या अधिकार्यानी याकडे डोळे झाक न करता रस्त्याचा मार्ग मोकळा करावा अशी मागणी केली आहे.