
#४० मोटरसायकल रायडींगची उपस्थिती!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
बेळगाव येथील बायकिंग ब्रदरहुड या मोटरसायकल रायडींग रेसच्या चाळीस युवकांनी यावर्षी २६ जानेवारी रोजी ७६ वा प्रजासत्ताक दिवस खानापूर तालुक्यातील कणकुंबी येथील माऊली विद्यालयात उपस्थित राहून साजरा केला.
बेळगाव हून सकाळी सात वाजता हे सर्व मोटर बाईक रायडर्स कणकुंबीला निघाले. ठीक साडेसात वाजता सर्व चाळीस मोटर बाईक रायडर्स कणकुंबी येथील श्री माऊली विद्यालयाच्या प्रांगणात पोहोचले.विद्यालयात झालेल्या देशाच्या ७६ व्या प्रजासत्ताक दिनाला मानवंदना दिली. यावेळी विद्यालयाच्या वतीने मुख्या.एस.जी चिगुळकर यांनी बायकिंग ब्रदरहुड संघटनेचे कम्युनिटी सदस्य गजेंद्र यादव,सिद्धांत पाटील,प्रवीण कुलकर्णी, अमित राऊत,दीपक हिरेमठ,महेश हसबे व इतर सर्व रायडर्सचे स्वागत केले.
यावेळी रायडर्स संघटनेच्या वतीने विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य दिन व प्रजासत्ताक दिनाबद्दल जनरल प्रश्न विचारून त्यांना आकर्षक बक्षिसे देण्यात आली.तसेच सर्व विद्यार्थ्यांना मिठाई वाटप करण्यात आली. त्याचबरोबर या संघटनेच्या वतीने मुख्या. एस.जी. चिगुळकर तसेच माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष महेश नाईक,विद्यालयाचे माजी विद्यार्थी व निवृत्त सुभेदार मेजर चंद्रकांत कोलीकर, ग्रामपंचायत अध्यक्षा दीप्ती गवस व माजी अध्यक्ष रमेश खोरवी आधी मान्यवरांचा सत्कार केला.याप्रसंगी गावातील नागरिक व माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.