
#हृदयविकाराचा झटका आल्याचा संशय!
# ट्रक चालक एम के हुबळीचा!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुक्यातील गणेबैल टोलनाक्याजवळ उस घेऊन जाणार्या ट्रकेत चक्क वाहन चालक मृत्यावस्थेत आढळल्याची माहिती मंगळवारी दि १७ रोजी उघड झाली.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की गणेबैल (ता.खानापूर) येथील टोलनाक्यापासुन हक्केच्या अतंरावर ऊसाने भरलेला ट्रक उभा होता. ट्रक बराच काळ उभा असल्याने हायवेच्या कर्मचार्यानी ट्रकमध्ये डोकावुन पाहिले असता. ट्रक चालक मृत्तावस्थेत आडवा पडलेल्या स्थितीत दिसुन आला.
लागलीच खानापूर पोलिसाना याची माहिती देण्यात आली.माहिती मिळताच पोलिसानी घटनास्थळी धाव घेतली.व ट्रक चालकाच्या जवळील लायसन्स व मोबाईल तपासुन त्याच्या ट्रक मालकाला व त्याच्या नातेवाईकाना संपर्क साधुन माहिती दिली.
सदर ट्रक चालकाचे नाव मुगुटसाब फकूसाब कोटूर (वय ४४) रा.एम के हुबळी असल्याचे निष्पण झाले.
यावेळी घटनास्थळी ट्रक मालकाने धाव घेऊण पोलिसाना सांगीतले की,सोमवारी रात्री उशीरा ट्रक घरी आला नाही.या काळजीने ट्रक चालकाशी फोनवर संपर्क साधला.परंतु संपर्क होऊ शकला नाही.अशी माहिती ट्रक मालकाने पोलिसाना दिली.
यावेळी ट्रक सोमवारी रात्री १२ वाजुन १० मिनिटानी टोलनाकावरून ट्रक पास झाल्याचे दिसुन आले.
सदर ट्रक चालकाला टोलनाका पास झाल्यानंतर छातीत त्रास झाल्याने ट्रक प्रसंगावधानाने रस्त्याच्या बाजुला लावले.त्यातच त्याचा मृत्यू झाला असावा .असा संशय व्यक्त करण्यात आला.
नातेवाईक येताच पोलिसानी कोणतीच तक्रार नसल्याने मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
सध्या थंडी प्रमाण वाढले आहे.रात्री वाढत्या थंडी मुळे त्याना हृदय विकाराचा झटका आला.आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाल्याची चर्चा घटनास्थळी होत होती.