
#नगरपंचायतीसह नगरसेवकांचे ही दुर्लक्ष!
#नुतन नगराध्यक्षा लक्ष देतील!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर शहराच्या उपनगरातील विद्यानगरात गेल्या कित्येक वर्षापासुन रस्ता ,गटारी व इतर सोयीकडे दुर्लक्ष झाल्याने विद्यानगरातील रहिवाशांचे हाल होत आहे
खानापूर शहराच्या हद्दीत व रामगुरवाडी ग्राम पंचायतीच्या सीमेवर असलेल्या विद्यानगराच्या वसाहतीत अद्याप रस्तेच झालेले नाहीत.तर काही ठिकाणी गटारीचा पत्ताच नाही. त्यामुळे पावसाळ्यात या रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पसरलेले असते. गटारी नसल्याने गटारीचे पाणी रस्त्यावरच वाहते.यामुळे पावसाळ्यात महिलाना ,वृध्दाना तसेच बालकाना घराबाहेर पडणे मुष्किल होते.
तर उन्हाळ्यात जागोजागी खड्डे पडल्याना वाहन धारकाना खड्डे चुकविताना आपघाताशी सामना करावा लागतो.
पाणी पुरवठा जलवाहिनीसाठी रस्त्यावर चर मारल्याने रस्त्याची दुर्दशा!
खानापूर शहरात पाणी पुरवठा करण्यासाठी जलवाहिणी घालण्यासाठी रस्त्यातुन चर मारल्याने विद्यानगरातील रस्त्याची दुर्दशा झाली आहे.त्यातच नगरपंचायतीच्या नळपाणी पुरवठ्याच्या पाईप फुटल्याने रस्त्याची दुर्दशा झाली आहे.याकडे नगरपंचायतीचे दुर्लक्ष झाले असुन नगरसेवक अथवा नगरपंचायतीचे चीफ आँफिसर समस्येकडे कधी ढुंकून ही पाहत नाहीत. त्यामुळे रहिवाशाना अनेक समस्याना तोंड द्यावे लागत आहे.
तेव्हा आमदारानी सुध्दा विद्यानगरातील रस्ता, गटारीच्या कामासाठी प्रयत्न करावे.अशी मागणी नागरीकातुन होत आहे.