
#जांबोटी सोसायटीच्या खानापूर शाखेचा रौप्य महोत्सव कार्यक्रम संपन्न!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर ( सुहास पाटील )
सध्या सहकार क्षेत्रात नव्या कायद्याने शिरकाव करून सहकार क्षेत्राचे जाळे कमी करण्याची वेळ आणली आहे. कोर्टात शेटलमेंटची तरतुद झाल्याने सोसायटी ढबघाईत आल्या व कर्जदार कर्ज भरण्याकडे साफ दुर्लक्ष करतात कोर्टाकडे गेल्यावर शेटलमेंटची भाषा काढतात.त्यामुळे सोसायट्या चालविणे कठीण होते. परंतु गरीबाना जगवायचे असेल तर सहकार क्षेत्र ठिकविणे काळाची गरज आहे. असे मत जांबोटी सोसायटीचे संस्थापक चेअरमन विलास बेळगावकर यानी सोसायटीच्या रौप्यमहोत्सवी कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून बोलताना व्यक्त केले.
यावेळी ते म्हणाले की १९९३ साली सोसायटीची स्थापना सहकार क्षेत्रात पाय टाकला गेल्या ३३ वर्षात सहकार क्षेत्रात अनेक बदल झाले. परंतु जांबोटी सोसायटीने स्वताच्या ईमारती ,१३०८ वाहनाचे वितरण,कर्ज वितरण करून सोसायटीचे नाव उज्वल केले. आज खानापूर शाखेला २५ वर्षे पूर्ण होत आहे.त्यानिमित्त हा रौप्यमहोत्सव सोहळा साजरा होत असे मत व्यक्त केले.
यावेळी व्यासपीठावर आमदार विठ्ठलराव हलगेकर, माजी आमदार अरविंद पाटील,तहसीलदार प्रकाश गायकवाड, बार एसोसिशेन अध्यक्ष व काॅग्रेस तालूका अध्यक्ष अँड ईश्वर घाडी,व्हनवादेवी को आँप सोसायटीचे ससंथापक चेअरमन विठ्ठल पाटील, राष्ट्रपती आदर्श शिक्षक पुरस्कार विजेते आबासाहेब दळवी, प्रकाश चव्हाण,अँड केशव कळेकर,व्हा.चेअरमन पुंडलिक नाकाडी, संचालक शंकर कुडतुरकर इतर संचालक व मान्यवर होते.
प्रास्ताविक स्वागत व्हा.चेअरमन पु़डलिक नाकाडी यानी केले.संचालक शंकर कुडतुरकर यानी संस्थेचा आढाव घेतला.
कार्यक्रमाची सुरूवात दीपप्रज्वलन व फोटो पुजनाने झाली.
यावेळी अँड ईश्वर घाडी,माजी आमदार अरविंद पाटील, आबासाहेब दळवी, तहसीलदार प्रकाश गायकवाड आमदार विठ्ठलराव हलगेकर ,संचालक भैरू पाटील आदीची सहकार क्षेत्राबद्दलची भाषणे झाली.
यावेळी पाच सभासदांचा सत्कार तसेच १० वीच्या परीक्षेत प्रथम आलेेल्या सभासदाच्या मुलाचा सत्कार पाहुण्याच्याहस्ते करण्यात आला.
आहवाल वाचन सेक्रेटरी दिलीप हुन्नरकर यानी केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन पत्रकार वासुदेव चौगुले यानी केले.तर आभार व्हा.चेअरमन पुंडलिक नाकाडी यानी मानले.
कार्यक्रमाला संचालक विद्यानंद बनोशी, यशवंत पाटील ,पांडुरंग नाईक ,शाहु गुरव,हणमंत काजुनेकर,खाचापा काजुनेकर,पुंडलिक गुरव,भाऊ कुर्लेकर,भरमानी नाईक,संचालिका गीता इंगळे,सरस्वती पाटील तसेच
,सेक्रेटरी, दिलीप हुन्नरकर,शाखा सेक्रेटरी सुर्यकांत बाबशेट व कर्मचारी तसेच सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.