
शुक्रवारी सदिच्छा समारंभ!
प्रमुख वक्त्या डाॅ.सरीता मोटराचे (गुरव )
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर (सुहास पाटील )
मराठा मंडळ संस्थेच्या खानापूर येथील ताराराणी हायस्कूलचे विज्ञान शिक्षक संजीव गणेश वाटूपकर हे गेल्या ३२ वर्षाच्या शिक्षकी सेवेतुन येत्या ३० सप्टेंबर रोजी सेवानिवृत होत आहेत.
ताराराणी हायस्कूलमध्ये सदिच्छा समारंभ!
उद्या शुक्रवारी दि .१३ सप्टेबर रोजी सकाळी १०.३० वाजता हायस्कूलच्या सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.
सदिच्छा समारंभाच्या अध्यक्षस्थानी हायस्कूलचे मुख्याध्यापक राहुल जाधव.तर प्रमुख पाहुणे म्हणून शिवाजीराव पाटील संचालक,मराठा मंडळ बेळगाव,व परशुरामआण्णा गुरव जेष्ठ संचालक मराठा मंडळ बेळगाव हे उपस्थित राहणार आहेत.
यावेळी सत्कारमुर्ती संजीव वाटूपकर याचा सत्कार होणार आहे.
यावेळी प्रमुख वक्त्या म्हणून डाॅ.सरिता मोटराचे (गुरव ) ( यशवंतराव चव्हाण महाविद्यालय हलकर्णी) या उपस्थित राहणार आहेत.
तरी यासोहळ्याला सर्वानी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी .असे आवाहन आयोजकाच्यावतीने करण्यात आले आहे.