
#आमदार फंडातुन २० संगणकाचे केले वितरण!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुक्यातील तलाठ्यासाठी आमदार फंडातुन २० संगणकाचे वितरण तहसील कार्यालयाच्या सभागृहात गुरूवारी करण्यात आले.
यावेळी आमदार विठ्ठलराव हलगेकर ,उपतहसीलदार राकेश बुवा,महसुल निरीक्षक व्यासपिठावर उपस्थित होते.
कार्यक्रमाला तालुक्यातील सर्व तलाठी उपस्थित होते.
यावेळी आमदार विठ्ठलराव हलगेकर यांच्याहस्ते संगणाकाचे वितरण करण्यात आले. यावेळी बोलताना आमदार म्हणाले की तालुक्यात तलाठ्याची कमतरता आहे.सध्या ४० तलाठी कार्यरत असुन सध्या आमदार फंडातील १० लाखाच्या फंडातुन २० संगणक वितरीत केली आहेत.
संगणक काळात तलाठ्यानी संगणकाचा वापर करून तालुक्यातील जनतेची सेवा करावी.असे आवाहन केले.
यावेळी आमदार विठ्ठलराव हलगेकर याच्याहस्ते फित कापून संगणकाचे वितरण करण्यात आले .