संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
सालाबाद प्रमाणे यंदा ही खानापूरात श्री चौराशीेदेवी संगीत कलामंच खानापूर आयोजित खुला गट श्री विठ्ठल नाद संगीत भजन स्पर्धा बुधवारी दि.१५ रोजी सकाळी ९ वाजता लोकमान्य भवन येथे आयोजित करण्यात आल्या आहेत.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाळासाहेब शेलार माजी ता.पं.सदस्य उपस्थित राहणार आहेत.
तर कार्यक्रमाचे उदघाटन आमदार विठ्ठल हलगेकर यांच्याहस्ते होणार आहे.दीप प्रज्वलन माजी आमदार व डी.सी सी बॅक संचालक अरविंद पाटील अमृत शेलार चेअरमन अर्बन बॅक,मुरलीधर पाटील चेअरमन पी.एल.डी बॅक, विलास बेळगावकर माजी अध्यक्ष म ए समिती, के.पी.पाटील संस्थापक साई प्रतिष्ठान,निरंजन सरदेसाई अध्यक्ष शिवस्वराज्य जनकल्याण फाऊंडेशन ,नगरसेवक नारायण मयेकर आदीच्याहस्ते होणार आहे.
यावेळी मान्यवरांच्याहस्ते फोटो पुजन होणार आहे. तर विविध मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.
विजयी स्पर्धकाना अनुक्रमे ७००१ रू.५००१ रू,३००१ रू,२००२ रू,१५०१ रू.अशी एकूण ११ बक्षिसे देण्यात येणार आहेत.
वेळ १५ मिनिटे देण्यात येणार आहे.तरी स्पर्धकानी याचा लाभ घ्यावा.असे आवाहन करण्यात आले आहे.