
#रविवारी सुट्टीचा दिवस भाविकानी घेतले दर्शन!
,संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
गेल्या १४ वर्षाच्या काळानंतर सन्नहोसुर,भंडरगाळी (ता.खानापूर) गावच्या ग्रामदेवता श्रीलक्ष्मी देवीच्या यात्रेला प्रारंभ होऊण रविवारी दि १६ रोजी पाचव्या दिवशी लक्ष्मी यात्रेला भाविकांनी एकच गर्दी केली होती.
रविवार सुट्टीचा दिवस असल्याने खानापूर तालुक्यासह बेळगाव तालुक्यातील भाविकानी श्रीमहालक्ष्मी देवीच्या दर्शनासाठी सकाळ पासुन गर्दी केली होती. रांगेत उभे राहुन शांततेत लक्ष्मी देवीचे दर्शन घेतले.
भाविकानी ओट्या भरून देवीचा नवस पूर्ण केला.
सन्नहोसुर ,भंडरगाळी या दोन्ही गावची लक्ष्मी यात्रोत्सवाला बुधवारी दि.१२ रोजी भंडार्याची उधळण करत ,हरहर महादेव आणि उदे गं अबें उदेच्या जयघोषात सुरूवात झाली.
गुरूवारी दि.२० रोजी सायंकाळी महालक्ष्मी देवी सीमेकडे प्रस्थान होणार आहे.
यात्रा काळात विविध मनोरंजनाचे कार्यक्रम पार पडले.