
# चुचंवाडच्या शेतकरी कुंटूबातील खेळांडू!
#आँल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी स्पर्धेत यश!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर (सुहास पाटील)
चुंचवाड ( ता.खानापूर ) गावातील शेतकरी कुटूंबातील खेळाडु शंशाक गंगाधर पाटील याने ओडीशा भुवनेश्वर येथे घेण्यात आलेल्या आँल इंडीया इंटर युनिव्हर्सिटी अँथेलेटिक स्पर्धेतील भाला फेक स्पर्धेत भाग घेऊन
७४.५६ मीटर अंतर भाला फेक करत रौप्य पदक पटकाविले.
शशांक पाटील हा इंटर युनिव्हर्सिटीला रौप्य पदक मिळविणारा खानापूक तालुक्यातील एकमेव खेळांडू असुन गुरू हिरेमठ नंतर युनिव्हर्सिटीला पदक मिळणारा शशांक हा दुसरा खेळांडू होय.
भुवनेश्वर येथे झालेल्या या स्पर्धेत शशांक पाटील याने पहिल्या फेकीत ७२ .९८ मीटर अंतर गाठले.तर दुसर्या फेकीत ७४.५८ मीटर अंतर फेकत प्रथम स्थान गाठले.
तिसर्या व चौथ्या फेरीत फेक फाॅल झाली.पाचव्या फेकीत ७६.९३ मीटर अंतर,व सहाव्या फेकीत ७३.२१ मीटर इतकी फेक केली.
यावेळी पंजाब विद्यापीठाच्या सागरने ८० मीटर ची फेक करत प्रथम क्रमांकासह सुवर्णपदक पटकावले.तर शशांक पाटील याने व्दितीय क्रमाकासह रौप्य पदक पटकाविले.
यापूर्वी शशांक पाटील याने म्हैसुर दसरा स्पर्धेत ७६.९२ मीटर अंतर फेक करत प्रथमक्रमांकासह सुवर्ण पदक पटकावुन विक्रम नोंदविला.परंतु युनिव्हर्सिटी स्पर्धेत शशांकला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले.
शशांक पाटील यांच्या यशाबद्दल खानापूर तालुक्यासह सर्वत्र अभिनंदन होत आहे.
शशांक पाटील याना युवजन क्रीडा खात्याचे अँथलेटीक प्रशिक्षक संजीव नाईक,संघ व्यवस्थापक रामराव,फिटनेस प्रशिक्षक बसवराज मुसन्नावर,याचे बहुमोल मार्गदर्शन मिळत आहे.
तर अँथलेटीक प्रशिक्षक अशोक शिंत्रे,मधुकर देसाई,युवजन क्रीडा अधिकारी श्रीनिवास बी. यांचे प्रोहोत्सन लाभत आहे.