
#सामाजिक नेेते यशवंत बीर्जे,विनायक मुतगेकर यांची उपस्थिती!
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुका काॅग्रेसचे अध्यक्ष अँड.ईश्वर घाडी यांच्या नेतृत्वाखाली कबनाळी शाळेचे मुख्याध्यापक बापू दळवी याची कन्या व बरंगाव मराठी शाळेची इयत्ता ६ वीची विद्यार्थीनी कुमारी श्रेया बापू दळवी हिने बेळगाव सह्याद्री सोसायटीच्या वतीने घेण्यात आलेल्या खानापूर तालुका भाषण स्पर्धेत प्रथम क्रमांक घेतल्या बद्दल बरगांव येथील निवासस्थानी बुधवारी दि.२९ रोजी रात्री ८ वाजता सत्कार करण्यात आला.
यावेळी खानापूर तालुका काॅग्रेस अध्यक्ष अँड.ईश्वर घाडी यानी श्रेया हिचा शाल ,पुष्पगुच्छ,मराठी निंबध पुस्तकासह मानधन देऊन सत्कार केला.
यावेळी सामाजिक नेते यशवंत बिर्जे, खानापूर तालुका ग्राम पंचायत सदस्य संघटनेचे अध्यक्ष विनायक मुतगेकर,मुख्याध्यापक बापू दळवी व दळवी कुटूंब उपस्थित होते.
यावेळी बोलताना अँड ईश्वर घाडी म्हणाले की, माजी आमदार व ए.आय.सी.सी.सेक्रेटरी डाॅ. अंजलीताई निंबाळकर याच्या प्रेरणेने तालुका काॅग्रेस पक्षाच्यावतीने हुशार विद्यार्थ्याना शाबासकीची थाप देण्यासाठी बरगावची कन्या श्रेया दळवी हिने इ.६ वीवर्गात असतानाच बेळगाव सह्याद्री सोसायटी आयोजित भाषण स्पर्धेत तालुक्यात प्रथम क्रमांक पटकाविला. याचा सार्थ अभिमान खानापूर काॅग्रेस पक्षाला असल्याने तिचा सत्कार करून गौरविण्यात आले.व तिला शुभेच्छा व्यक्त केल्या.
यावेळी दळवी कुटूंबानी तालुका क्राॅग्रेस पक्षाच्या वतीने श्रेयाचा सत्कार केल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.