
#खानापूर,लोंढा,देवराई,तावरगट्टी रेल्वे स्थानक सल्लागार समितीचा समावेश!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर ( सुहास पाटील )
बेळगाव जिल्हा भारतीय जनता पार्टीच्यावतीने खानापूर तालुक्यातील खानापूर,लोंढा,देवराई,तावरगट्टी आदी रेल्वे स्थानक सल्लागार समितीवर निवडूण आलेल्या सदस्यांचा बेळगाव जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात गुरूवारी दि.३० रोजी सत्कार सोहळा पार पडला
यावेळी बेळगावचे खासदार व माजी मुख्यमंत्री जगदिश शेट्टर , बेळगाव जिल्हा भाजपा अध्यक्ष सुभाष पाटील, माजी आमदार संजय पाटील आदी उपस्थित होते.
यावेळी खासदार व माजी मुख्यमंत्री जगदिश शेट्टर यांच्याहस्ते रेल्वे सल्लागार सदस्य राजेद्र रायका,गजानन पाटील, गुंडू तोपिनकट्टी,सुनिल नायक, गजानन पाटील, अशोक देसाई, मोहन पाटील, दिलीप सोनटक्के , अमोल बेळगांवकर , बाळाराम सावंत आदीचा, शाल, हार घालुन सत्कार करण्यात आला.