
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
कानशिनकोप (ता.खानापूर ) गावचे सुपूत्र ,कर्नाटक ग्रामिण विकास संघाचे अध्यक्ष नागेंद्र चौगुला यांचा मुद्देबिहाळ येथील व्ही बी सी हायस्कूलच्या मैदानावर कर्नाटक स्टेट युनियन आँफ युथ असोसिएशन स्टेट युनिट बेंगलोर,जिल्हा युनिट विजयपुरा आणि तालुका युनिट मुद्देबिहाळ यांच्या सयूंक्त विद्यामाने स्वामी विवेकानंद राज्य सदभावना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले .
आमदार सी एस नाडागौडा यांच्या अध्यक्षतेखाली पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी शिवकुमार महास्वामी,अतिरीक्त जिल्हाधिकारी सोमलिंगा गन्नूर,डाॅ एस बालाजी,बेळगांव जिल्हाध्यक्ष सिध्दणा दुरंदुडी,पुंडलिक मुराळा,राघवेंद्र,महादेव मुरगोड,केदारलिंग संभोजी इतर मान्यवर व संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.