
#असोगा,कौंदल,झाडनावगे,किरहलशी गावच्या युवकांचा समावेश!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर ( सुहास पाटील )
सैन्यात भरती होणे प्रत्येकाच्या नशीबात नसते. जो भाग्यवान असतो त्यालाच सैन्यात सेवा करण्याची संधी मिळते.
” देश सेवा हीच सर्व श्रेष्ठ सेवा आहे. म्हणून सैन्यात भरती झालेल्या प्रत्येक युवकाने देशाची सेवा प्रामाणिक करा. कारण तुमच्या आई वडिलानी आपल्या पाल्याना देश सेवेसाठी सैन्यात भरती करण्यासाठी तयारी दर्शविली याचे मला कौतुक वाटते.
असे मनोगत घाडी फाऊंडेशनचे अध्यक्ष व खानापूर तालुका क्राॅग्रेसचे अध्यक्ष अँड.ईश्वर घाडी यानी खानापूर रेल्वेस्टेशनवर सैन्यात भरती झालेल्या युवकांच्या सत्कार प्रसंगी बोलताना व्यक्त केले.
खानापूर तालुक्यातील असोगा,कौंदल,झाडनावगे,किरहलशी यागावच्या युवकांची नुकताच भारतीय सैन्यात निवड झाली. त्यानिमित्त सेवेत रूजू होण्यासाठी खानापूर रेल्वे स्टेशनवर उपस्थित होते. यावेळी सैन्यात भरती झालेल्या युवकांचा शाल,पुष्पहार व पेढे भरून त्याचा सत्कार करण्यात आला.
यावेळी विठ्ठल महाराज, ग्राम पंचायत सदस्य संघटनेचे अध्यक्ष विनायक मुतगेकर, सैन्यात भरती झालेल्या युवकांचे पालक ,नांतेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.