
#बुधवारी सप्ताहाची सुरूवात! गुरूवारी महाप्रसादाचे आयोजन!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर ( सुहास पाटील)
सिंगीनकोप ( ता.खानापूर ) गावचा श्री पांडुरंग सप्ताह सोहळा सालाबाद प्रमाणे बुधवारी दि २६ रोजी सकाळी भक्तीध्वज रोहण होऊन सुरूवात होणार आहे.
त्यानंतर ज्ञानेश्वरीचा ९ वा व १२ अध्ययाचे सामुहिक वाचन ,दुपारी सांप्रदायीक भजन ,सायंकाळी प्रवचन ,रात्री सांप्रदायिक भजन व भारूड आदी कार्यक्रम होणार आहेत.
गुरूवारी दि.२७ रोजी पहाटे काकड आरती ,पंचवटी त्यानंतर सकाळी ८ वाजता श्रीच्या पालखीची दिंडी यात्रा होऊन त्यानंतर महाप्रसादाने पांडुरंग सप्ताह सोहळ्याची सांगता होणार आहे.
सिंगीनकोपची कलमेश्वर यात्रा सोमवारी.
सिंगीनकोप ( ता.खानापूर ) गावची ग्रामदेवता कलमेश्वराची यात्रा साला बाद प्रमाणे यंदा ही सोमवारी दि. ३१ मार्च रोजी प्रारंभ होत आहे.
सोमवारी दुपारी ४ वाजता करडी मजल व भजनाच्या निनादात गावातुन पालखीची व आंमली गाड्यांची मिरवणूक कलमेश्वर मंदिराकडे निघणार आहे.
मंगळवारी दि १ एप्रिल रोजी सकाळी ७ वाजता स्वामी बसय्या हिरेमठ व वसिलदार गावडा यांच्या हस्ते कलमेश्वर मंदिरात पिंडीची पुजा व अभिषेक होऊन सकाळी १० वाजुन १५ मिनिटानी इंगळ्यांचा कार्यक्रम होणार आहे.दुपारी १२ वाजता महाप्रसादाला सुरूवात होऊन सायंकाळी पालखी व गाडा वाजत गाजत गावाकडे येऊन यात्रेची सांगता होणार आहे.
तेव्हा भाविकानी कलमेश्वर यात्रेला उपस्थित राहुन महाप्रसादाचा लाभ घ्यावा.असे आवाहन यात्रा कमिटी व गावकर्याच्या वतीने करण्यात आले.