
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर शहरातील मिलाग्रीज चर्च हायर प्राथमिक मराठी शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन आज शुक्रवारी दि.३१ रोजी सायंकाळी ५ वाजता आयोजीत करण्यात आला आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रेव्ह.फादर नेल्सन पिंटो प्राचार्य सर्वोदय हायस्कूल उपस्थित राहणार आहेत.
तर प्रमुख अतिथी म्हणून आमदार विठ्ठलराव हलगेकर, प्रभारी बी ई ओ ए आर अबंगी,डाॅ.माधव प्रभू,उद्योजक भुषणराव काकतकर, रेव्ह.फादर रोट्रीक फर्नाडिस,विजय होळणकर, शरद केशकामत,एम डी सदानंद पाटील,एन श्रीनिवास ,प्रशांत गुरव आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
तरी सर्वानी उपस्थित राहण्याचे आवाहन मुख्याध्यापक प्रशांत अळवणी यानी केले आहे.