
#जिल्हाशिक्षणाधिकारी श्रीमती लिलावती हिरेमठ यांची उपस्थिती!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर ( सुहास पाटील )
खानापूर शहरातील समर्थ इंग्लिश मिडीयम स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन आज शुक्रवारी दि.३१ जानेवारी रोजी दुपारी ४ वाजता जांबोटी रोडवरील शुभम गार्डन येथे आयोजित करण्यात आले आहे.
यावेळी कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून बेळगांव जिल्हाधिकारी श्रीमती लिलावती हिरेमठ, खानापूरचे प्रभारी बी.ई.ओ. ए.आर.अंबगी व इतर सी आर पी उपस्थित राहणार आहेत.
यावेळी संस्थेचे प्रसिडेंट एफ.एम. पाटील, व्हाईस प्रसिंडेट डाॅ.आर.हेरवाडेकर, सेक्रेटरी डाॅ.डी.ई.नाडगौडा,खजीनदार डाॅ.पी.एन. पाटील, संचालक अरविंद जोरापूरे, डाॅ. एन.एल. कदम, सुरज मोरे,मोनिका फर्नाडिस,नारायण चोपडे आदी उपस्थित राहणार आहेत.
तरी कार्यक्रमाला पालकानी ,विद्यार्थ्यानी तसेच नागरीकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन प्राचार्या सौ दीव्या नाडगौडा यानी केले आहे.