
# एक गाव एक संघ!
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर ( सुहास पाटील )
चन्नेवाडी ( ता. खानापूर ) येथील सुर्वोदय युवक मंडळाच्यावतीने खास दिपावली निमित्त गुरूवारी दि ३१ रोजी एक गाव एक संघ भव्य खुल्या कबड्डी स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे.
विजयी कबड्डी संघाला पहिले बक्षिस १५,००१ रू.दुसरे बक्षिस १०,००१रू.तिसरे बक्षिस ५००१रू.चौथे बक्षिस २,००१रू. व इतर वैयक्तीक बक्षिसे देण्यात येणार आहेत.
स्पर्धा उदघााटनच्या अध्यक्षस्थानी श्रीभाग्यलक्ष्मी सोसायटीचे चेअरमन शामराव पाटील (चन्नेवाडी )हे उपस्थित राहणार आहेत.
तर उपस्थित मान्यवरांच्याहस्ते दीपप्रज्वलन व फोटो पुजन होऊन स्पर्धाचे उदघाटन होणार आहे.
तरी कबड्डी संघानी याचा लाभ घ्यावा. असे आवाहन करण्यात आले आहे.