
#कडकडीत हरताळ पाळण्याचे आवाहन!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर म ए समितीच्या वतीने मंगळवारी जांबोटीत काळ्यादिनी पत्रके वाटून कडकडीत हरताळ पाळण्याचे आवाहन करण्यात आले.
यावेळी बोलताना सरचिटणीस आबासाहेब दळवी म्हणाले की, केंद्र सरकारने भाषाार प्रांत रचना करून १ नोव्हेंबर १९५६ रोजी बेळगांव ,कारवार, निपाणी,बिदर, भालकीसह बहुसंख्य मराठी भाषिक प्रदेश अन्यायाने कर्नाटकात डांबण्यात आल्याने बहुसंख्य मराठी भाषिकावर अन्याय होत आहे. गेल्या ६७ वर्षापासुन सीमाभागातील मराठी भाषिक जनतेची महाराष्ट्रात जाणाची इच्छा अद्याप कायम असुन सीमाभागातील मराठी जनता दरवर्षी बेळगावसह सीमाभागात १ नोव्हेंबर या दिवशी काळा दिन पाळुन व्यवहार बंद ठेवुन निषेध व्यक्त करते.
तेव्हा यंदाही १ नोव्हेंबर रोजी काळ्यादिनी व्यवहार बंद ठेवुन कडकडीत हरताळ पाळावा.असे आवाहन यावेळी त्यानी केले.
यावेळी खानापूर म ए समिती अध्य क्ष गोपाळ देसाई,सरचिटणीस आबासाहेब दळवी,गोपाळ पाटील ,पांडुरंग सावंत (गर्लगुंजी) माजी जिल्हा पंचायत सदस्य जयराम देसाई,संजीव पाटील, राजाराम देसाई ,पुंडलिक भरणकर,सहदेव नाईक,भास्कर बिर्जे,कृष्णा महाजन,शामराव देसाई,मारूती मादार आदी मान्यवर उपस्थित होते.