
#खानापूर जांबोटीक्राॅसवरून ऊसाने भरलेल्या ट्रकाची येजा!
#यंदा गळीतहंगामाला सुरूवात
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
यंदा सरासरी पेक्षा जास्त पाऊस झाला आहे.जुलै, आँगष्ट महिण्यात झालेल्या अति पावसामुळे ऊस पाण्याखाली राहुन ऊस उत्पादकाचे मोठे नुकसान झाले आहे.त्यामुळे ऊस उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
यापार्श्वभूमीवर कारखान्यास ऊस मिळविण्यासाठी ऊस कारखानदारात मोठी चढाओढ सुरू आहे.
खानापूर तालुक्यातून ऊसाची उचल सुरू!
नोव्हेबर महिण्याच्या सुरूवातीलाच खानापूर तालुक्याच्या विविध भागातुन ऊसाच्या ट्रका भरून तालुक्याच्या बाहेर जात आहेत.
खानापूर तालुक्यात हत्तीची दास्ती.त्यामुळे ऊस उत्पादक ऊस पाठविण्यास तयार!
खानापूर तालुक्याच्या जंगलभागातील ऊस उत्पादकाना गेल्या वर्षाभरापासुन ठाणे मांडुन बसलेल्या हत्तीकडुन ऊस पिकाचे मोठे नुकसान होत आहे.याची दास्ती ऊस उत्पादकानी घेतली.त्यामुळे नोव्हेंबर महिण्यापासुन आपला ऊस होता होईल तेवढ्या लवकर हत्तीच्या तावढीतुन पाठवून देण्याची तयारी दर्शविली आहे.
त्यामुळे खानापूर तालुक्यातुन ऊसाच्या ट्रका तालुक्याच्या बाहेर जाताना दिसत आहे.
सध्या तालुक्याच्या काही भागात तुरळक ऊस वाहतुक सुरू आहे.येत्या काही दिवसात तालुक्यातुन ऊस वाहतुक मोठ्या प्रमाणात होण्याची चिन्हे दिसत आहे.
शुक्रवार पासुन गळीत हंगामाला सुरूवात साखर मंत्री शिवानंद पाटील!
कर्नाटकात ऊस गळीत हंगामाला लवकरच प्रारंभ होतो.ही परंपरा आहे. यंदा ही कर्नाटकातील साखर कारखान्यानी ऊस गळीत हंगामाला शुक्रवार दि ८ पासुन सुरूवात केली आहे .अशी माहिती साखर मंत्री शिवानंद पाटील यानी दिली.
ते म्हणीले की यंदा १५ नोव्हेबर पासुन गळीत हंगामाची सुरूवात करण्याचा निर्णय कर्नाटक सरकारने घेतला होता.मात्र साखर कारखानदाराकडुन मागणी असल्याने आठवडाभर आदीच हंळीत हंगामाला सुरूवात होत आहे .असे सांगीतले.
त्यामुळेच खानापूर तालुक्यातुन ऊसाची वाहतुक होताना दिसत आहे.