
#१०० टन उस जळून खाक!
संदेश क्रांती न्यूज
खानापूर (सुहास पाटील )
रूमेवाडी ( ता.खानापूर ) गावचे शेतकरी मारूती चौगुले ,मनोहर चौगुले,बबन चौगुले,अशोक चौगुले यांच्या मालकीचा उस हलात्री नदीजवळी हल्टीकल्चर नर्सरीजवळ आहे.
शुक्रवारी दि .२५ रोजी दुपारी अचानक उसाला आग लागली.बघता बघता आगीने रूद्रावतार घेतला. लागलीच शेजारच्या शेतकर्यानी आरडा ओरड करून आग लागल्याचे सांगताच लोकानी आग विजविण्यासाठी प्रयत्न केले.लागलीच अग्नीशामक दलाला आगीची माहिती देताच अग्नीशामक दलाचे जवावानी शर्थीचे प्रयत्न करून तब्बल एक तासानंतर आग आटोक्यात आणण्यात अग्नीशामक दलाच्या जवानाना यश आले.
या आगीत रूमेवाडी गावच्या चार शेतकर्याच्या शेतातील जवळपास १०० टन ऊस जळुन खाक झाला आहे.
त्यामुळेत्याशेतकर्याचे लाखो रूपयाचे नुकसान झाले आहे.
आगीचे नेमके कारण समजु शकले नाही. मात्र नुकसान ग्रस्थ शेतकर्याना नुकसान भरपाई सरकारने मिळवुन देण्याची मागणी गावकर्यातुन होत आहे.