
#विविध सहा ठिकाणी छापे!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुक्याचे तहसीलदार प्रकाश गायकवाड याच्यावर बुधवारी दि ८ रोजी विविध सहा ठिकाणी छापे टाकले.
प्रथम बेळगांव गणेशपूर (लक्ष्मीटेक ) बंगल्यावर छापा टाकला.त्याच वेळी खानापूर तहसील कार्यालय,तसेच खानापूर शहरालगत हलकर्णी कलमेश्वर नगरातील भाडोत्री घरावर ,तर निपाणी येथील घरावर ,व बसस्थानक परिसरातील अस्थापन , त्याचबरोबर अकोळ येथील पत्नीच्या माहेरी देखील छापा टाकुन मोठे घबाड लोकायुक्तांच्या हाती लागण्याची शक्यता आहे.
तर खानापूर तहसील कार्यालयातील कागदपत्रे लोकायुक्त अधिकार्यानी ताब्यात घेतली आहेत.
यावेळी बेळगावचे लोकायुक्त पोलिस अधिक्षक हणमंतराय यांच्या मार्गदर्शनाखाली खानापूर तहसील कार्यालयात धारवाडचे उपअधिक्षक रविंद्र कुरूबगट्टी,याच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक संतोष लकमन्नावर ,पोलिस मंजुनाथ वालीकर,व रमेश पुजारी यानी कागदपत्राची पडताळणी केली,व अवश्यक ती कागदपत्रे हाती घेण्यात आली.
तसेच खानापूरजवळील हलकर्णी येथील घरात बेळगावचे उप अधिक्षक भरत रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली कारवाई करण्यात आली.
तहसीलदार प्रकाश गायकवाड हे निपाणीत सेवा बजावत होते.
बुधवारी दि.८ रोजी सकाळी ७ वाजता कारवाई सुरू होती.ती दुपारी उशीरापर्यत कारवाई सुरू होती. नेहमीच गजबजनारे तहसील कार्यालय आज शांत होते.