
#भाजपसह विविध संघटनेचे पदाधिकार्याचा सहभाग!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
भाजपचे माजी मंत्री व एमएलसी. सी टी रवी याना अटक करून आणले होते.यावेळी खानापूरचे पोलिस निरीक्षक मंजुनाथ नायक यांना कर्तव्यात कसुर केल्याचा ठपका ठेवत तसेच भाजप नेताना खानापूर पोलिस स्थानकात प्रवेश दिल्याने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
केवळ राजकीय सुडापोटी पोलिस अधिकार्यानी खानापूरचे पोलिस निरीक्षक मंजुनाथ नायक यांच्यावर निलंबनाची कारवाई केली गेली.
तेव्हा हे निलंबन विनाविलंब रद्द करावे .अशा मागणीचे निवेदन खानापूर तहसीलदारांच्यातर्फे उत्तर विभागाचे पोलिस महानिरीक्षकाना देण्यात आले.
निवेदन देताना भाजपा खानापूर तालुका माजी अध्यक्ष संजय कुबल,सचीव गुंडू तोपिनकट्टी, जिल्हा प्रधान सचिव धनश्री सरदेसाई, राजू रायका,बाबा देसाई, पंडित ओगले,गजानन पाटील,इतर भाजपचे कार्यकर्ते व विविध संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी उपतहसीलदार राकेश बुवा यानी निवेदन स्विकार करून सरकारकडे पाठवुन देण्याचे आश्वासन दिले.