
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
दि.१ जूलै २०२२ ते ३१ जूलै २०२४ या कालावधीत २५ महिने सेवा पूर्ण केलेल्या कर्मचार्यांच्या आर्थिक तोट्याच्या भरपाईसाठी सुविधा मागणीसाठी कर्नाटक निवृत्त कर्मचारी मंचाच्या केंद्र समिती, बेंगळुरू तालुका शाखा खानापूर यांच्या वतीने तहसीलदार यांच्या मार्फत सन्माननीय मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना निवेदन सादर केले.
निवेदनात म्हटले आहे की, दि. ०१-०७-२०२२ ते ३१-०७-२०२४ या कालावधीत निवृत्त कर्मचाऱ्यांच्या आर्थिक तोट्याच्या भरपाईसाठी सुविधा देण्याबाबत मागणी करण्यात आली. तसेच, या संदर्भात आजवर झालेल्या संघर्षाच्या विविध टप्प्यांची आठवण करून देत त्वरित योग्य ती पावले उचलून भरपाई देण्याची विनंती करण्यात आली.
या वेळी तालुक्यातील सर्व विभागांचे निवृत्त कर्मचारी, कर्नाटक राज्य सरकारी कर्मचारी संघाचे पदाधिकारी, शिक्षक संघाचे पदाधिकारी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
यावेळी उपतहसीलदार के आर कोलकार यानी निवेदनाचा स्विकार करून सरकार कडे पाठविण्याचे आश्वासन दिले.
निवेदन देताना तालुका नोकर संघाचे अध्यक्ष बी एम येळ्ळूर, निवृत्त शिक्षक एस आर कुंदरगी,एम बी भावीमणी,एल डी पाटील, विलास धबाले, एस बी किल्लीकत्तर,एम के गावडे, श्री गुळशेट्टी,ए.आर .पत्तार तसेच संघटनचे श्री बेपारी,आदी निवृत्त कर्मचारी उपस्थित होते.