
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
नेहमीच चर्चेत असलेले खानापूरचे तहसीलदार प्रकाश श्रीधर गायकवाड यांच्या जवळपास ४ कोटी रूपयांच्या गैरव्यवाहार प्रकरणी त्याना निलंबीत करण्यात आले आहे
दि.८ जानेवारी रोजी त्यांच्या राहत्या घरासह ६ ठिकाणी लोकायुक्तानी छापेमारी करून कागदपत्रे जप्त केली होती. यात तहसीलदार प्रकाश गायकवाड यानी उत्पन्ना पेक्षा अधिक मालमत्ता गैरमार्गाने कमवल्याचे स्पष्ट झाल्याने त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली.
यावेळी तहसीलदार गायकवाड यांच्यावर अनेक तक्रारी दाखल झाल्या होत्या. त्यानी वेगवेगळ्या ठिकाणी गैरव्यवहार मार्गाने मालमत्ता खरेदी केल्या होत्या.एवढेच नव्हेतर खानापूर अनेक ठिकाणी लोकाना धमकावुन ,फसवुन जमिनी खरेदी केल्याच्या तक्रारी जिल्हाधिकार्याचे नोंद होत्या.
त्याची दखल घेत लोकायुक्तानी त्याच्यावर कारवाई केली.जानेवारीत त्याच्या मालमत्ताची छाननी चालु होती.
त्यानंतर आज सोमवारी दि.१० रोजी निलंबनाची कारवाई करण्यात आली.