
#कळसारोहण,वास्तूशांती,उदघाटन समांरभ !
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर (सुहास पाटील )
डुक्करवाडी (फुलोवाडी) ( ता.खानापूर) येथील जिर्णोध्दार केलेल्या कुटी माऊली मंदिराचा लोकार्पण सोहळा उद्या सोमवारी दि.१६ रोजी सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आला आहे.
सकाळी कळसारोहण पीरयोगी सारगनाथ कारभारी महाराज कुंभार्डा यांच्याहस्ते होणार आहे.
मंदिराचा लोकार्पण सोहळा आमदार विठ्ठलराव हलगेकर यांच्याहस्ते तर गाभारा लोकार्पण सोहळा मारूती कुंभार व माजी आमदार ,डीसीसी बॅक संचालक अरविंद पाटील यांच्याहस्ते होणार आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शेतकरी नाना पाटील असतील तर दिपप्रज्वलन प्रमोद कोचेरी, मुरलीधर पाटील, के.पी पाटील,यशवंत बीरजे,प्रविण अगणोजी,आदीच्या हस्ते होणार आहे.
विविध फोटोचे पुजन हलकर्णी ग्रा पं उपाध्यक्षा सौ उज्वला भैरू कुंभार,माजी जि प सदस्य नारायण कार्वेकर,प्रशांत आयहोळे,संजय चौगुले,वसंत कुंभार आदीच्याहस्ते होणार आहे.
यावेळी विविध मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित राहणार आहेत.
दुपारी महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता होणार आहे.
शुक्रवारी दि २० रोजी कुटी माऊली यात्रा होणार आहे.
तेव्हा सर्वानी याचा लाभ घ्यावा.असे आवाहन श्री कुटी माऊली देवस्थान कमिटी व पंचकमिटी ग्रामस्थ डुक्करवाडी यांच्यावतीने करण्यात आले आहे.