
#महाप्रसादाचा घेतला लाभ!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर ( सुहास पाटील )
खानापूर तालुक्यातील तिर्थकुंडे (कौलापूरवाड) येथील प्रसिध्द देवस्थान श्री रामलिंग देवस्थान मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही शिवरात्रीचा सन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
महाशिवारात्रीच्या उत्सवानिमित्त गुरूवारी दि.२७ रोजी सकाळी ७ ते दुपारी ३ वाजेपर्यत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
यानिमित्त खानापूर तालुका ब्लाॅक अध्यक्ष अँड ईश्वर घाडी व खानापूर तालुका ग्राम पंचायत सदस्य संघटनेचे अध्यक्ष विनायक मुतगेक यांनी तिर्थकुंडे येथील महाप्रसादाला उपस्थिती लावुन महाप्रसाद घेतला.
प्रारंभी काॅग्रेसचे नेते भैरू पाटील यानी अँड.ईश्वर घाडी व विनायक मुतगेकर यांचा फेटा बांधुन सत्कार केला.
यावेळी बोलताना अँड. ईश्वर घाडी म्हणाले की कौलापूरवाड ( ता.खानापूर) येथील हभप ववैकुंठवासी धोंडू वाघू पाटील व कै.साऊबाई धोंडू पाटील यांच्या स्मरणार्थ निवृत्त शिक्षक वाघू धोंडू पाटील व सौ मालुबाई वाघू पाटील यांच्याकडुन महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. कारण महाप्रसादासारखे पवित्र काम निवृत्त शिक्षक वाघू पाटील यानी केले.त्याच्या कार्याचे कौतुक करावे तेवढे थोडचे आहे. तिर्थकुंडे परिसरातील हजारो भाविकानी या महाप्रसादाचा मोठ्यासंख्येने उपस्थित राहुन लाभ घेतला. याचा मला सार्थ अभिमान वाटला.
यावेळी निवृत्त शिक्षक वाघू पाटील, सिद्राय जांबोटी,शिवाजी जांबोटी,गंगाराम येडगे, मालु शिंदे,रामा गावडे,नामदेव पाटील बाबू बावदाने,चंद्रकांत तुर्केवाडी, व्हळ्याप्पा संजीमनी,प्रकाश मजगावी आदी उपस्थित होते.
काग्रेस नेेते भैरू पाटील यानी आभार मानले.