
#अभिषेक ,पुजा व भजनी कार्यक्रम!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
तोपिनकट्टी ( ता.खानापूर ) येथील अमरदीप युवक मंडळाच्यावतीने श्री गणेशमुर्ती प्राणप्रतिष्ठापनेचा २३ वा वर्धापन दिन शुक्रवारी दि. ४ एप्रिल रोजी पार पडला.
यावेळी सकाळी सकाळी ७ ते ८ यावेळेत श्री मंगलमूर्तीला परशराम करंबळकर याचा शुभहस्ते अभिषेक करण्यात आला.
रात्री भजनी कार्यक्रमाचे आयोजन!
वर्धापन दिनानिमित्त आज रात्री ८ वाजता भजनी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निवृत्त मुख्याध्यापक महादेव गुरव उपस्थित राहणार आहेत.
यावेळी दीपप्रज्वलन आमदार विठ्ठल हलगेकर यांच्याहस्ते होणार आहे. विविध फोटोचे पुजन ग्राम पंचायत अध्यक्षा सौ.अनिता मुरगोड,उपाध्यक्षा सौ.पारव्वा हुडेद व सर्व सदस्य तसेच विठ्ठल करंबळकर उपाध्यक्ष श्री महालक्ष्मी सोसायटी ,संचालक चांगाप्पा निलजकर,जनरल मॅनेजर तुकाराम हुंदरे, मल्लारी खांबले,रामचंद्र हलगेकर आदीच्या हस्ते होणार आहे.
यावेळी श्री चव्हाटा संगीत सोंगी भजनी मंडळ हेब्बाळहट्टी यांच्या भजनी भारूडाचा कार्यक्रम होणार आहे.
शनिवारी महाप्रसादाचे आयोजन!
शनिवारी दि. ५ रोजी सायंकाळी सत्यनारायण पुजा,महाआरती, त्यानंतर प पू रामदास महाराज यांचे प्रवचन होऊन रात्री ८ ते १० पर्यत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
तरी भाविकानी याचा लाभ घ्यावा. असे आवाहन करण्यात आले आहे.