
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
तोपिनकट्टी ( ता.खानापूर ) येथील श्री महालक्ष्मी ग्रुप एज्यूकेशन सोसायटी संचालित शांतिनिकेतन पदवीपूर्व द्वितीय वर्षाचा निकाल उत्तमरित्या लागला. खानापूर तालुक्यामध्ये वाणिज्य विभागात महाविद्यालयाची विद्यार्थिनी श्रुष्टी पाटील हिने द्वितीय क्रमांक व विद्यालयात प्रथम क्रमांक पटकाविला, तर विज्ञान विभागातून विद्यालयात विद्यार्थिनी साक्षी असोगेकर हिने प्रथम क्रमांक पटकाविला.
वाणिज्य विभागाचा परीक्षेचा निकाल!
वाणिज्य विभागातून श्रुष्टी पाटील हिने ९३.३३% गुण मिळवून महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकाविला आहे. तर निकिता पाटील हिने ९०.६६ %, गुण मिळवून द्वितीय क्रमांक पटकाविला आहे. तर ओमकार हलगेकर ह्याने ८५.३३% गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकाविला आहे. प्राची पाटील हिने ८१ % गुण मिळवून चौथा क्रमांक पटकाविला आहे. आणि ज्योती गुरव व कुसुम गुरव हिने ७८% गुण मिळवून पाचवा क्रमांक पटकाविला.

# विज्ञान विभागाचा निकाल!
विज्ञान विभागातून साक्षी असोगेकर हीने ८३.३३% गुण मिळवून महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर लक्ष्मी कुंभार हिने ७९.५० % मिळवून द्वितीय क्रमांक पटकावला आहे. तर प्रणाली पाटील हिने ७८ % मिळवून तृतीय क्रमांक पटकाविला आहे.
या विद्यार्थ्यांना खानापूर तालुक्याचे आमदार आणि श्री महालक्ष्मी सोसायटीचे संस्थापक-अध्यक्ष विठ्ठलराव सोमान्ना हलगेकर, सचिव प्रा.आर. एस. पाटील तसेच सर्व महालक्ष्मी एज्युकेशन सोसायटीचे संचालक व प्राचार्या सुवर्णा निलजकर तसेच कॉलेजचे सर्व प्राध्यापक वर्गाचे सहकार्य लाभले आहे. या सर्वांच्या वतीने कॉलेजच्या प्राचार्यानी सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.