
#अज्ञाताकडुन आग लागल्याची चर्चा!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
रूमेवाडी क्राॅस ( ता.खानापूर ) शहरापासुन जवळ असलेल्या ऊसाच्या फडाला रविवारी दि. २९ रोजी दुपारी अचानक ऊसाला आग लागल्याने लाखो रूपयाचे नुकसान झाल्याची घटना घडली.
याबाबत मिळालेली माहिती असी की शेतीमालक मारूती वाणी यांच्या मालकीची जमिन खानापूर शहरापासून जवळ असलेल्या रूमेवाडी क्राॅसजवळ खानापूर नंदगड रस्त्या लगत असलेल्या १५ एकर जमिनीतील असलेल्या उसाला रविवारी दुपारी अचानक अज्ञाताकडुन आग लावल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
भर दुपारी उसाला आग लागल्याने आगीचा भडका उडाला. त्यामुळे आगीने रूद्रावतार धारण केला.लागलीच अग्नीशामक दलाला पाचारण करण्यात आले. तोपर्यत निम्मा ऊस जळुन खाक झाला. व आग्नीशामक दलाने उर्वरीत निम्मा ऊस वाचविला.
त्यामुळे ऊस मालक मारूती वाणी याना लाखो रूपयाचा फटका बसला.
उन्हाळ्यात ऊसाला आगी लागण्याचे प्रकार सर्रास घडतात.
सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने कधी विधुत ताराचे घर्षणाने ठिणगी पडुन ऊसाला आग लागण्याचे प्रकार घडतात. तर कधी अज्ञाताकडुन आग लागण्याचे प्रकार घडतात.तेव्हा ऊसाची उचल लवकर करणे महत्वाचे आहे.