
#दोन दिवस कार्यक्रम !
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर ( सुहास पाटील )
चिगुळे ( ता.खानापूर ) गावची ग्राम दैवत व नवसाला पावणारी श्रीदेवी म्हातारीबाय देवीचा दुसरा वर्धापन दिन कार्यक्रम आज सोमवार व मंगळवार असे दोन दिवस चालणार आहे.
सोमवार दि. १० रोजी सकाळी ८ वाजता देवीचा अभिषेक सोहळा होणार आहे.१० वाजता सत्यनारायण पुजा,तिर्थप्रसाद तर दुपारी १.३० वाजता महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी भजनाचा कार्यक्रम तर रात्री मुलाचा डान्स व सांस्कृतीक कार्यक्रम होणार आहे.
मंगळवारी दि ११ रोजी सकाळी महाभिषेक ,आरती,नैवेद्य,व धार्मिक विधी.९ वाजता देवीला ओटी व मानपान ,अर्पण करण्यात येतील,दुपारी २ वाजता देवीच्या मानाचा महाप्रसाद ,तर सायंकाळी देवीची ओटी भरण्याचा कार्यक्रम होणार आहे.
रात्री भजनाचा व सत्कार कार्यक्रम तर रात्री नाट्यप्रयोग सादर करण्यात येणार आहे.