
#खानापूर काॅग्रेस अध्यक्ष अँड.ईश्वर घाडी यांचे मार्गदर्शन!
खानापूर (सुहास पाटील )
यडोगा ( ता. खानापूर ) येथील भावकेश्वरी युवक संघाच्या खो खो स्पर्धा नुकताच पार पडल्या.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राध्यापक एन एम सनदी होते.
तर प्रमुख पाहुणे खानापूर क्राॅग्रेस अध्यक्ष अँड.ईश्वर घाडी होते.
उदघाटन प्रसंगी बोलताना अँड.ईश्वर घाडी म्हणाले की,खेळ हा आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक यासाठी कबड्डी ,खो-खो,तसेच बॅटमिटन खेळ खेळुन खानापूर तालुक्याचे नाव उज्वल करत जिल्हा,राज्य स्तरीय स्पर्धेत यश मिळविले आहे.
तसेच आमच्या नेत्या माजी आमदार व ए आय.सी सी सेक्रेटरी डाॅ.अंजली निंबाळकर तालुक्यातील खेळाडुच्या खेळाना प्राद्यान्य देत राष्ट्रीय पातळीवरील कबड्डी खेळ भरवुन खानापूर तालुक्याचे नाव देश पातळीवर चमकविले याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. त्याबदल त्याचे आभार व अभिनंदन करतो.
यावेळी ते म्हणाले की यडोगा युवक मंडळाचे कार्य कौतुकास्पद आहे.
यावेळी स्पर्धाचे उदघाटन मान्यवराच्याहस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाला रामा खाबले,तुकाराम सनदी,सलिम कित्तूर, निवृत्त मुख्याध्यापक होसुर,यल्लापा खांबले,पत्रकार पिराजी कुराडे,आप्पाजी पाटील,पंडित ओगले,अजित पाटील, व गावकरी उपस्थित होते.